वेगा व्हेकेशन्स

कोकण सहल

३ दिवस – २ रात्र कोकण सहल

वेगा व्हेकेशन्स आयोजित कोकण सहल ही अस्सल ग्रामीण कोकणी अनुभव देणारी व मध्य कोकण सफर समाविष्ट असणारी सहल आहे.

शर्मिष्ठा सी व्ह्यू व्हिला, कोकणातील कोळथरे या गावात स्थित आहे. कोळथरे हे दापोलीपासून 20 किमी अंतरावर आहे. कोळथरे हे, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले, अगदी चित्रातल्या गावाप्रमाणे एक छोटेसे निसर्गरम्य, काहीसे दुर्गम, शांत कोंकणी गाव आहे. या व्हिलामध्ये मर्यादित ठराविक सेवेसह आरामदायक सुविधा आहेत. व्हिलामध्ये  एक मध्यवर्ती कॅफेटेरिया आहे जिथे आमचे केअरटेकर तुम्हाला स्वादिष्ट अस्सल कोकणी खाद्यपदार्थ पुरवतील. सर्वांना कौटुंबिक वेळेचा निखळ आनंद घेता यावा यासाठी आम्ही हेतूपुरस्सर व्हिलामध्ये टीव्ही फॅसिलिटी दिलेली नाही. शर्मिष्ठा अस्सल ग्रामीण कोकणी जीवन अनुभवण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.

या सहली मध्ये खालील ठिकाणे समाविष्ट आहेत:

✓ शिवथरघळ

✓ कोळथरे (दापोली)

✓ अंजनवेल लाईट हाऊस

✓ गणपतीपुळे (पर्याय १) किंवा गुहागर मगर सफारी आणि बॅकवॉटर हाऊसबोट क्रुझ (पर्याय २)

✓ बामणघळ, हेदवी

✓ वेळणेश्वर

✓ गुहागर

✓ चंडिका माता मंदिर, दाभोळ

✓ परशुराम भूमी — बुरोंडी

✓ आंजर्ले कड्यावरचा गणपती

Tour Package

नियोजित प्रवास कार्यक्रम: –

दिवस ०१: –

सकाळी ६.३० वाजता पुणे येथुन भोर मार्गे शिवथरघळ साठी प्रयाण.

टिप: काही कारणास्तव जर वरंधा घाट बंद असेल तर ताम्हाणी मार्गे थेट कोळथरे ला जाण्यात येइल. त्या वेळी शिवथरघळ ला भेट देता येणार नाही. कृपया ह्याची नोंद घ्यावी.

शिवथरघळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते. रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली.

दुपारी 1.30 वाजता आपण कोळथरे ला पोहोचतो.

— दुपारचे जेवण —

दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन,आपण नंतर प्रसिद्ध कोळेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी रवाना होतो.

यानंतर आपण कोळथरे बीचकडे रवाना होतो. हे ठिकाण कित्येकांना फारसे परिचित नसल्यामुळे याला कोकणातील लपलेले रत्न म्हणूनही ओळखले जाते.

कोळथरे समुद्रकिनारा हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. जिथे पंचनदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो असे हे एक अद्वितीय ठिकाण आहे. शांत समुद्रकिनाऱ्यावर मजामस्तीचे, आनंदाचे क्षण अनुभवून व सूर्यास्ताचे सौंदर्य नजरेत साठवत आपण रात्रीचे जेवण व रात्रीच्या मुक्कामाकरता शर्मिष्ठा सी व्ह्यू व्हिला कोळथरे येथे येतो.

 

दिवस ०२: –

(पर्याय १) – गणपतीपुळेसह:

सकाळी ८ वाजता, नाश्ता करुन कोळथरे येथुन गणपतीपुळे साठी प्रयाण.

साधारण सकाळी ११.३० वाजता गणपतीपुळे येथे आगमन व दर्शन.

नंतर प्राचीन कोकण दालनाला भेट. गणपतीपुळ्यापासून १ की. मी. अंतरावर असलेले ‘प्राचीन कोकण दालन’ हे एक चुकवू नये असेच ठिकाण आहे. कोकण परिसराचा ५०० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास इथे हुबेहूब दिसणाऱ्या लाकडाच्या मानवी पुतळ्यांमधून साकारला आहे. कोकणाची प्राचीन समाजरचना, जुनी वेशभूषा व केशभूषा, बारा बलुतेदार, जुनी उपकरणे व हत्यारे यांच्या सहाय्याने इतिहास जिवंत केला आहे. हिरव्यागर्द टेकडीवर ३ एकर जागेत एक टुमदार कोकणी गाव इथे उभं राहिलं आहे. माफक तिकिटांत तेथील गाईडच्या सहाय्याने आपल्याला या प्राचीन कोकणीची सफर घडते. बांबूच्या पट्ट्या लावून बनविलेल्या इथल्या मचाणावरून दिसणारे गणपतीपुळ्याच्या समुद्राचे विहंगम दृश अत्यंत सुंदर दिसते. (*तिकिट खर्च वेगळा.)

— दुपारचे जेवण —

दुपारच्या जेवणानंतर जयगड मार्गे बामणघळ, व हेदवीकडे प्रयाण. नंतर वेळणेश्वरला आणि प्रसिद्ध गुहागर व्याडेश्वर मंदिर व बीचला भेट.

नंतर, विशाल व विस्तीर्ण अश्या अरबी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी आपण अंजनवेल लाइटहाऊसला भेट देतो. दाभोळ खाडी ओलांडताना वाटेत फेरी बोट राईड चा आनंद घेता येतो. ही फेरी बोट राईड हा एक अनोखा अनुभव असतो आणि विशेषत: मुलांसाठी हि एक आनंदाची पर्वणीच असते.

नंतर दाभोळ येथील स्वयंभू चंडिका माता मंदिराकडे प्रयाण.

संध्याकाळी कोळथरे ला परत. शर्मिष्ठा सी व्ह्यू व्हिला कोळथरे येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.

दिवस ०२: –

(पर्याय २) – गुहागर बॅकवॉटर क्रूझ आणि मगर सफारीसह

अंजनवेल लाइटहाऊसवरून बलाढ्य अरबी समुद्राचे दृश्य अनुभवल्यानंतर, आपण गुहागर जवळील परचुरी गावा कडे बॅकवॉटर हाऊसबोट क्रुझ  आणि  मगर सफारीकरिता जातो.

 बॅकवॉटर हाऊसबोट क्रुझ  आणि  मगर सफारी ह्या दोन वेगवेगळ्या क्रुझ आहेत ज्याचे पैसे थेट हाऊसबोटच्या कार्यालयात भरावे.

 संध्याकाळी गुहागर किनाऱ्याला भेट देऊन आपण नंतर दाभोळ येथील स्वयंभू चंडिका माता मंदिराकडे प्रयाण करतो.

संध्याकाळी कोळथरे ला परत. शर्मिष्ठा सी व्ह्यू व्हिला कोळथरे येथे रात्रीचे जेवण व मुक्काम.

दिवस ०३: –

सकाळी, आपण कोळथरे बीचवर डॉल्फिन पाहण्यासाठी जातो. हि १ तासाची राइड असते. डॉल्फिन पाहण्यासाठी आपल्याला आत समुद्रामध्ये नेले जाते. डॉल्फिन राईड हि पूर्णपणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते व हा राईड खर्च सहल पॅकेजमध्ये समाविष्ट नसतो. डॉल्फिन राइड सर्व उपलब्धतेवर व सर्व अनुकूलतेवर अवलंबुन असते.

नाश्त्यानंतर, आपण भगवान परशुराम भूमीकडे जातो. हे ठिकाण डोंगरावर स्थित असून, इथून आजूबाजूच्या निसर्गाचे सुंदर दृश्य बघता येते. भगवान परशुरामाची मूर्ती सुमारे २१ फूट उंच असून, ती ४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर उभारलेली आहे.

यानंतर आपण आंजर्ले स्थित प्रसिध्द कड्यावरचा गणपती मंदिरात जातो. ह्या मार्गाने जाताना अरबी समुद्राची नयनरम्य दृश्ये नजरेस पडतात जी कायम आठवणीत राहतात.

तसेच वाटेत सुवर्णदुर्ग किल्ला आणि हर्णे बंदराचे दृश्य नजरेस पडते.

— दुपारचे जेवण —

अस्सल कोकणी जेवणाचा आनंद घेऊन आपण पुण्याला परतीचा प्रवास सुरू करतो.

 

मुक्काम: –

सहलीतील मुक्काम शर्मिष्ठा सी व्ह्यू व्हिला, कोळथरे येथे असणार आहे आहे. दाट हिरव्या झाडांमध्ये वसलेला, शर्मिष्ठा हा एक खाजगी व्हिला आहे, जिथून नदी आणि समुद्राचे मनमोहक दृश्य नजरेस पडते.

सहलीचा खर्च आणि वाहतूक तपशील:

Tour Cost

पीक तारखांसाठी वरील दर लागू नाहीत.

समावेश:

  • प्रवासाच्या कार्यक्रमानुसार स्थळ भेटी
  • नाश्ता – दिवस ०२ आणि ०३
  • नमूद केलेल्या वाहनानुसार प्रवास
  • फेरी बोट शुल्क
  • ड्रायव्हर चार्जेस

 

 

Location: -

Sharmishtha Sea View Villa

Plot No. 25,

Panchanandi Park, Kolthare,

Dapoli 415712.

 

Contact Us: -

Email: [email protected]

Phone: +919370313000